बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • राज्यात उत्पादीत कच्च्या मालाची प्रक्रिया क्षमता वाढवणे.
    • समतोल प्रादेशिक विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
    • विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी गुणवत्ता मानके वाढवून उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे.
    • उद्योगाने एसडीजी 2030 साध्य केल्याची खात्री करणे आणि सर्वसमावेशक विकासासाठी सर्व पद्धतींचे पालन करणे
    • कौशल्य विकास आणि क्षमता वाढीसाठी सहाय्य करणे आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करणे.
    • शाश्वत विकासासाठी सेंद्रिय कापूस आणि इतर सेंद्रिय नैसर्गिक तंतूंचा नैसर्गिक रंगांच्या संयोगाने विकास आणि संवर्धन करणे.
    • संशोधन आणि विकासाला चालना देणे आणि मूल्य शृंखला विकसित करुन मजबूत करणे.
    • पारंपारिक हातमाग वस्त्रोद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी हातमागाचा प्रचार आणि विकास करणे. हातमाग विणकरांना शाश्वत रोजगार प्राप्त करुन देणे.
    • राज्यातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राचा प्रचार आणि विकास करणे.